You are currently viewing ११ मार्चला कणकवलीत माेफत तबलावादन प्रशिक्षण..

११ मार्चला कणकवलीत माेफत तबलावादन प्रशिक्षण..

कणकवली :

 

११ मार्च रोजी कणकवलीत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्र अंतर्गत तबला वादन प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. सकाळी १० वाजता या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी पंडित डॉ. समीर दुबळे उपस्थित राहणार आहेत. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांची शिष्य चारुदत्त फडके हे तबलावादनाचे प्रशिक्षण देणार आहेत सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे तबला वादन प्रशिक्षण मोफत असणार आहे. याकरिता सोबत तबला जोड असण्याची गरज आहे. तर सायंकाळी चारुदत्त फडके यांचे तबला एकल वादन असणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी सीमा कोरगावकर ९४२२३८१९७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आचरेकर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा