You are currently viewing “महिलांनी स्वावलंबी बनण्यावर भर द्यावा..” – सरोज देसाई यांचे प्रतिपादन….

“महिलांनी स्वावलंबी बनण्यावर भर द्यावा..” – सरोज देसाई यांचे प्रतिपादन….

भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक महिला दिन ‘ उत्साहात साजरा…

सावंतवाडी

भोसले नॉलेज सिटी येथे जागतिक महिला दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर या नात्याने संस्थेच्या अध्यक्षा ऍड.सौ.अस्मिता सावंत भोसले, उपाध्यक्षा श्रीमती सरोज देसाई, सदस्या सौ.सानिका देसाई, प्रशासकीय अधिकारी सौ.सुनेत्रा फाटक उपस्थित होत्या.


कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपाध्यक्षा सरोज देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींनी चांगले शिक्षण घेऊन भावी आयुष्यात स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावे असे आवाहन केले.


अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले यांनी आज आपण जीवनात जे काही आहे ते फक्त आपल्या आईमुळेच असून प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आईचे स्थान हे एक मार्गदर्शक शिक्षिका व मैत्रीणीप्रमाणे असल्याचे सांगितले. सुनेत्रा फाटक यांनी स्त्री जवळ एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची कुशलता असल्याचे अधोरेखित केले .

यावेळी संस्थेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिला स्टाफ तसेच विद्यार्थिनींनी याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन प्रा.रश्मी महाबळ यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा