कणकवली
जागतिक महीला दिन व आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून आज दिनाक 08 मार्च 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता महीलांचे हक्क व भारतीय संविधान या विषयावर ॲड. स्वाती तेली यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना ॲड.स्वाती तेली यांनी मानवी मूल्ये, महीलांचे हक्क, महीलांकरीता असलेले महत्वाचे कायदे याचा आढावा घेतला. सध्याच्या काळात महीलांनी सक्षम बनणे कीती आवश्यक आहे हे पटवून दिले काही महत्वाच्या कोर्ट खटल्यांचे, निकालांची माहीती या अनुषंगाने दिली. या कार्यक्रमास ओसरगांव जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. कदम सर हे देखील उपस्थीत होते. यांनी विद्यार्थ्यांना आपल्या संत व समाजेवकांचे दाखले देते महीला सक्षमीकरण होणे गरजेचे असल्याचे सांगीतले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांनी सिंधुदूर्ग जिल्हयातील यशस्वी महीलांची उदाहणे देत मुलांना ख-या अर्थांने सुशिक्षीत होणे काळाची गरज आहे असे सांगीतले. सध्याच्या आधुनिक काळात आजही ग्रामीण भागात मुलगा असेल तर त्याच्या गरजांकडे प्राध्यान्याने पाहीले जाते तर मुलगी असल्यास तीचे लग्न करुन दिले की आपली जबाबदारी संपली म्हणून मुलींच्या गरजांकडे दुलर्क्ष केले जाते. हे चित्र बदण्याची गरज असल्याचे मत प्राचार्य तारी यांनी मांडले.
महीला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या कर्मचारी सौ. रिया नाईक या ओसरगांव ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याबददल महाविद्यालयाच्या वतीने ॲड. स्वाती तेली यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व महीला कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालीयन विद्यार्थ्यीनींनी केलेल्या विविध महीला समाजसेवीका व नेत्यांच्या केलेल्या वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमीत्त महीला विकास कक्ष व हॉटेल मॅनेजमेंट विभागामार्फत पाककला स्पर्धा व तृणधान्यवर आधारीत भित्तीपत्रक व विविध पदार्थांचे प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते. तृणधान्य पाककला स्पर्धेचे उदघाटन ॲड. स्वाती तेली यांच्या हस्ते तर तृणधान्यवर आधारित भित्ती पत्रक व विविध वस्तूं व पदार्थांच्या प्रदर्शनाचे उदघाटन प्राचार्य समीर तारी यांच्या हस्ते करण्यात आले. पाककला स्पर्धेमध्ये कणकवली, कसाल, ओसरगांव, आंब्रड, कळसूली या पंचक्रोशीतील महीलांनी उस्फुर्त प्रतीसाद नोंदवीला. या स्पर्धेत सौ. अस्मिता कारेकर यांनी बनवीलेल्या नाचणी व बाजरीचे सत्व या पाककृतीस प्रथम क्रमांक तर सौ. दिपीका भिसे यांनी बनवीलेल्या नाचणीचे मोदक या पाककृतीस व्दितीय क्रमाक आणि तेजस्वीनी कसालकर यांनी बनवीलेल्या नाचणीची बर्फी या पाककृतीस तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून बी.एस्सी हॉस्पीटीलीटी विभागाचे प्रा. पदमाकर शेटकर, प्रा. अमित तावडे व प्रा. लाजरी सिधये यांनी काम पाहीले. स्पर्धेचे बक्षिस वितरण उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापकीय अधिकारी श्री. संतोष सावंत, बी.एस्सी. हॉस्पीटीलीटी विभाग प्रमुख प्रा.प्रथमेश ठाकूर, महीला विकास कक्ष प्रमुख प्रा. राधीका सावंत, बी.एस्सी आयटी विभाग प्रमुख प्रा.अमरेश सातोसे व अन्य प्राध्यापक उपस्थीत होते.