You are currently viewing रंगोत्सवाची होळी…

रंगोत्सवाची होळी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

*रंगोत्सवाची होळी…*

फाल्गुन महिन्याचे आगमन आणि होळीचे दहन अगदी हातात हात घालून येतात. आणखी एका वर्षाला निरोप देताना, सर्वत्र पसरलेल्या दुष्ट प्रवृतींना आणि दुसवासाच्या गारव्याला ऐक्य, सत्य अन् विवेकाच्या अग्नीने राख करून, नव वर्षाचे स्वागत असंख्य रंगांच्या रंगाने करण्याचि प्रथा म्हणजे होळी.

होळीच्या अनेक कथा आहेत, सगळ्यात लोकप्रिय ती होलिका दहनाची.

भक्त प्रल्हाद भगवान विष्णुची उपासना निरंतर करत असे. हे त्याच्या पिता हिरण्यकश्यपु ह्यास काही रुचत नसे. त्याने काही ना काही प्रकाराने प्रल्हादास त्याची भक्ति बंद करण्यास सांगितले, पण प्रल्हाद काही ऐकेना. पिता एक राक्षस वृत्तीचा दानव होता, त्याला देवाचे अस्तित्व कसे पटणार! तो “देव” ह्या संकल्पनेचाच इतका द्वेष करायचा की प्रल्हादाचे अस्तित्वच त्याने संपुष्टात आणायचे ठरविले. त्याने आपली बहीण होलिका हीस लहानग्या प्रल्हादास अग्नीत आहुती म्हणून देऊन त्यास मारण्यास सांगितले. होलिकेस अग्नी-अभय प्राप्त होते. पण दुष्ट प्रवृत्तीस कुठले अभय! आहुती म्हणून अग्नी देवाने होलिका चा प्रसाद स्वीकारला. अन् प्रल्हाद आपल्या भक्तीत लीन राहिला. दुष्टत्वावर पवित्रतेचा आणि सत्याचा विजय झाला.आणि भक्त प्रल्हाद जीवित राहिला.

होळीच्या रूढी अशा आहेत, की पोर्णिमेच्या दिवशी, सूर्यास्ता नंतर, साऱ्या शुद्धी करून, पांढरी शूभ्र वस्त्र परिधान करून, होळी बांधून, तिची पूजा करावी. दूध, पुरण, तळण, ह्याचा सुग्रास नैवेद्य दाखवून, तिला पेटववी. तिला मीठ, मोहरी, धान्याची आहुती चढवावी. श्रीफळ अर्पण करावे आणि जल अर्पण करून, पूजेची सांगता करावी. प्रार्थना करावी की आपल्या सानिध्यात असणार्या सगळ्या दुष्टात्वाचा तुझ्या तेजस्वी अग्नित भस्म होऊन नाश व्हावा आणि सर्वत्र सूख, शांति व प्रेम पसरू देत. होळी रात्रभर जळु द्यावी आणि दुसर्या दिवशी सकाळी, धुळवडीची सुरूवात, ह्या शमलेल्या होळीच्या राखेला मस्तकी लाऊन करावी. काळी राख ही दुष्ट प्रवृत्ती च्या नाशाचे प्रतीक आहे, तर गुलाल हे त्यावर चांगुलपणा च्या विजयाचे प्रतीक आहे. शुभ्र वस्त्र ही मनातल्या भावनांच्या पावित्र्याचे प्रतीक आहे.

तेंव्हा हे तिन्ही एकत्र आल्यावर, किती सुंदर अर्थबोध होतो. मनाच्या पावित्र्याने दुष्टावर विजय रंगवीला.

तसा हा सण पाच दिवस चालायचा. म्हणजे पौर्णिमे पासून ते पंचमी पर्यंत. दुसरा दिवस धुळवडीचा. ह्या दिवशी गुलालाने एकमेकाना रंगवून प्रेम सर्वत्र पसरवतात. तिसऱ्या दिवशी, हळद कुंकू अभीर गुलालाने रंग खेळतात. चौथ्या दिवशी एकमेकांकडे जाउन मिठाई थंडाई वाटत वाटत सण साजरा करतात, तर पंचमी च्या दिवशी सग्ळे एकत्र येऊन, खाणे पिणे, मौज मस्ती, रंगवा रंगवी करून संध्याकाळी आपापल्या घरी परतात.

होळीचाच आणखी एक पैलू म्हणजे
कृष्ण-लिला. ती कुणास ठाउक नाही? “कान्हा ना मारो पिचकारी..” अशा विनवण्या करणाऱ्या गोपी आणि गवळणी. आणि आपल्या खट्याळ खेळांनी त्यांना सतावणारा आपला सर्वांचा लाडका गोपाळकृष्ण.. आधी रगावणाऱ्या आणि नंतर त्याची वाट पाहाणाऱ्या गोकुळ च्या गवळणि आणि द्वारकेच्या गोपिका. आणि मग गोपळाचा कन्हैय्या झाला तेंव्हा त्याची राधा आणि सर्व त्याच्यावर प्रेम करणाऱ्या गोपी-गावाळणी. होळी चे महत्व प्रेमाशी जुळवून देतात, ज्याला कसलीही सीमा नाही, वयाचे बंधन नाही, की काळाची ओढ नाही. .

तर, होळी हे दुष्ट प्रवृत्तीच्या नाशाचे प्रतीक आहे. खरतर होळी ह्या उत्सवाचा उगम भारतातल्या उत्तर प्रांतात झाला आहे, पण आज संपूर्ण देशाने त्याला आपल्या रंगात रंगवून घेतलाय. मूळचा हिंदू सण असून आता त्यास एक सामाजिक प्रथा म्हणून बघितला जातो. राष्ट्रीय सुट्टी जाहीर असते आणि सर्व जात-पात, भाषा, वर्ण, वयाचा कुठलाहि भेद न मानता, मनसोक्त रंग लूटतात. एकमेकांना आपलंस करून घेत असतात. साथीला पुरणाची पोळी आणि थँडाई आणखीनच रंगत वाढवते. उत्साहाच्या ह्या बहुरंगी इंद्रधनूने ही अवघी पृथ्वी सजीव होते. सर्वत्र आनंदी आनंद, हर्ष अन् उल्हास पसरलेला असतो.

पांढारी शुभ्र वस्त्र घालून, पावित्रतेला मान देऊन, त्यावर प्रेमाचे, उल्हासाचे, सत्याचे, संस्कृतीचे, विवेकाचे, असे रंग चढवावे की पूर्ण वर्ष सुख शांती आणि समृद्धीच्या भरभराटीत पार बुडून जावे.

अशी ही होलिका कोरोना सारख्या महामारीला कायम स्वरुपी जाळून टाकू दे आणि जगावर घोंगावणार हे संकट कायमचे दूर होऊ दे म्हणून आपण तिला प्रज्वलित करूयात.

जय होलिका माते🙏🙏


*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा