*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ स्वाती गोखले यांनी “बौछार” या कवी “गुलजार” यांच्या कवितेचा केलेला भावानुवाद*
*बौछार* *कवी:- गुलजार*
मैं कुछ कुछ भूलता जाता हूॅं अब तुझको
तेरा चेहरा भी धुंधलाने लगा हैं अब तख्खयुल में,
बदलने लगा है अब वो सुबहो शाम का मामूल,
जिसमें….. तुझसे मिलने का भी इक मामूल शामिल था !
तेरे खत आते रहते थे तो मुझको याद रहते थे तेरी आवाज के सूर भी!
तेरी आवाज को कागज पे रख के, मैंने चाहा था कि “पिन” कर लूॅं, वो जैसे तितलीयोंके पर लगा लेता है कोई अपनी अलबम में!
तेरा “बे” को दबाकर बात करना, “वॉव” पर होठोंका छल्ला गोल होकर घूम जाता था !
बहुत दिन हो गये देखा नहीं,
ना खत मिला कोई,बहुत दिन हो गये सच्ची !!!
तेरी आवाज की बौछार में भीगा नहीं हूॅं मैं !!!!!
मी केलेला भावानुवाद….
*एकदाच…..*
अलीकडे मी तुला विसरायला लागलोय…..
माझ्या मनातील तुझा चेहराही धूसर होत चाललाय…..
आता माझी सकाळ-संध्याकाळची वेळेची गणितं पण चुकतायत….
ज्यात मी आपल्या भेटीची वेळेची देखील नोंद करून ठेवायचो….
तुझी पत्रं मला यायची, त्यातून तुझा आवाज माझ्या कानाशी गुणगुणायचा……
तुझ्या गोड आवाजाला कागदावर ठेवून तो जोडावासा वाटायचा…..
*पिनअप* केल्यासारखा मनाशी…….
खोल मनाच्या तळाशी…..
जसे फुलपाखरांचे पंख कुणी अल्बममध्ये ठेवावेत तसे….
तुझ्या *काय रे तू* म्हणताना लाडिक लाजणारी तू ….
*वॉव* म्हणताना तुझ्या गोंडस गोड ओठांचा होणारा गोल चंबू….
हे सगळं मी खूप दिवसांत पाहिलंच नाही ग….
खरंच….
खूप दिवसांत…..
तुझ्या मधुर आवाजाच्या वर्षावात मी भिजलोच नाही ग….
त्या आवाजाची बरसात माझ्यावर करशील का ग ?…..
एकदा….. फक्त एकदाच….
आपल्या नात्याचा दरवळ मला घेऊ देशील एकदा ? ……
एखादा उत्कट क्षण तसाच परत येईल का ? ….
भावनांचा तोच जुना वर्षाव पुन्हा होईल का ? ….
जसं गुलाबाचं फूल पूर्ण उमललं की त्याचा सुगंध दरवळत राहतो मनात….तसा……..
अगदी तस्साच….
एकदा…….
परत एकदा………
फक्त एकदाच…………
सौ.स्वाती गोखले.
पुणे.
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————