“Most creative women, अर्थात सौ. उमा सुरेश प्रभू…..
– अॅड. नकुल पार्सेकर…
फार पुर्वी महिलासाठी एक ब्रिद वाक्य ठरलेलं होत, ” चुल किंवा मुलं. ” दिवसेंदिवस परिस्थिती बदलली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला पुरूषापेक्षाही काकणभर जास्त विविध क्षेत्रात आपला प्रभाव आणि कर्तुत्व दाखवू लागल्या. आज जगात असं एकही क्षेत्र नाही की, ज्या क्षेत्रात महिलांचा प्रभाव आपल्याला दिसत नाही. अर्थात परिस्थितीमुळे टॅलेंट असूनही काही महिला या कुटुंबाच्या चार भिंतीत अडकून पडल्या हा अपवाद सोडल्यास महिलांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला सिद्ध केलेलं आहे. उद्या आठ मार्च जागतिक महिला दिन. महिलांच्या कर्तुत्वाचा आणि क्षमतांचा आढावा घेणारा दिवस.
महिला सबलीकरणाच्या कितीही बाता आपण राजकीय व्यासपीठावरून मांडल्या तरी निदान गावपातळीवर आपल्याला पुरूषप्रधान संस्कृतीचा अनुभव आजही येतो.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अशा एका कर्तुत्ववान आणि स्वयंप्रकाशीत महिलेचा मी आज थोडक्यात आढावा घेणार आहे. खरं तरं त्यांच कर्तुत्व माझ्या सारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्त्याने शब्दबद्ध करणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास.
या कर्तुत्ववान महिला म्हणजे गोमंतक भूमीची कन्या आणि सिंधुदुर्गच्या स्नुषा सौ. उमा सुरेश प्रभू. जनमानसात त्यांची ओळख ही त्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले हिंदुस्थानचे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्र निर्माणामध्ये फार मोठं योगदान असलेल्या मा. सुरेश प्रभूंच्या धर्मपत्नी म्हणून ओळख असली तरी त्यांची या देशातील एक तळागाळातील लोकांसाठी सामाजिक भान ठेवून रचनात्मक काम करणाऱ्या महिला म्हणून स्वतंत्र ओळख आहे. प्रभू दांपत्याचा देशातील व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांच्याबरोबर अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. याचा उपयोग करून कोकणामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प मा. उमा मॅडम व प्रभू साहेब यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी केला. नव्वद च्या दशकात भारताने खुली अर्थव्यवस्था व डंकेल प्रस्ताव स्विकारला. साहाजिकच सरकारी नोकऱ्यावरं मर्यादा आल्या त्यामुळे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली. मा. प्रभूसाहेबानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जनशिक्षणच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक युवतींना आवश्यक प्रशिक्षण देवून रोजगाराची दालनं खुली केली. या जनशिक्षणच्या अध्यक्ष पदाची धुरा सौ. प्रभू यांनी यशस्वीपणे सांभाळली. सुमारे सात वर्षे या जनशिक्षणचा एक विश्वस्त म्हणून उमा मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली.
या जिल्ह्यातील गरीब व होतकरू मुलींना नर्सिंगसाठी मुंबई, पुण्या सारख्या शहरात जावून प्रशिक्षण घेणं शक्य नव्हते. ही गरज ओळखून सौ. उमा मॅडमनी अणाव, ता. कुडाळ येथे नर्सिंग काॅलेज सुरू केल. या जिल्ह्यातील शेकडो मुलींनी नर्सिंगची पदवी प्राप्त करून बहुसंख्य मुली आज मुंबई, पुणे, गोवा सारख्या शहरात सरकारी व खाजगी हाॅस्पिटलच्या आस्थापनेत कार्यरत आहेत. सुरूवातीला छोट्याशा जागेत असणारं नर्सिंग काॅलेज आता भव्यदिव्य अशा इमारतीतं कार्यरत आहेत.
मा. उमा प्रभू यांची पञकारितेची प्रदिर्घ पार्श्वभूमी आहे. सुमारे पस्तीस वर्षाहून जास्त काळ त्यांनी पञकारितेच्या जगतात आपली प्रभावी कामगिरी बजावली.देश परदेशातील अनेक वृत्तपत्रात विविध विषयांवर त्यांनी केलेलं लिखाण असेल वा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना केलेले मार्गदर्शन हे नेहमीच दिशादर्शक आहे. झी मिडियाच्या समुह संपादक, डिएन्ए च्या समुह संपादक, एज्युकेशन टाईम्स मुंबई मॅगझीन इंडिया टुडे ग्रुप, आयटीव्ही नेटवर्क प्रा. लिमिटेड,दै.स्टार डस्ट,पाप्युलर प्रकाशनच्या मुख्य संपादक अशा देशातील एक नव्हे अनेक लिडिंग वृत्तसमुहात विविध जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्या.पञकारिता हा समाजाचं वास्तव प्रतिबिंब दर्शवणारा आरसा असतो. याच विचाराने त्यांनी पञकारिता केली. अनपेक्षितपणे साहेबांचा राजकारणात प्रवेश झाला. माञ त्यावेळी सुध्दा साहेब ज्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते तेव्हा जर काही जनतेच्या विरोधात काही निर्णय असतील तर जरी साहेब मंञी असले तरी आपणं जरी त्यांची सहचारिणी असले तरी जे चुकीचे आहे ते पञकार म्हणून मांडताना त्यांनी कधीच परिणामाचा विचार केला नाही. आजच्या पञकारितेचा जेव्हा आपणं विचार करतो तेव्हा प्रकर्षाने समाजहिताची आदर्श पञकारिता कशी असावी? याचं उमाताई हे उत्तम उदाहरण आहे.
कोकण विभागात जनशिक्षण, ल्युपिन फाऊंडेशन, मानव संसाधन विकास संस्था, परिवर्तन केंद्र अशा माध्यमातून विविध घटकांना विकास प्रक्रियेत आणण्याचं कामं सातत्याने गेली तीस वर्षे सुरू आहे.. पण या कामाची ना कधी प्रसिद्धी, नो होर्डिंग्ज याचं कारण या दांपत्याची रहाणी अतिशय साधी आणि सर्वसामान्यांना अपील होणारी. कोणताही बडेजाव नाही.. सोबत कार्यकर्त्यांच्या झुंडी नाहीत. अतिशय संयमाने, शांतपणे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आज कोकणात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम सुरु आहे. उमा मॅडम व साहेब ही जोडी म्हणजे एक चालतं बोलतं सर्वज्ञानी विद्यापीठ. ज्या विद्यापीठाचा उपयोग माझ्या सारख्या देशातील व परदेशातील असंख्य शिकावू विद्यार्थ्यांना होत आहे. बौद्धिक संपदा या दांपत्याकडे ओतप्रोत भरलेली आहे… आणि त्याचा उपयोग समाजबांधणीसाठी होत आहे.
माझ्या सुदैवाने मी मा. उमा मॅडम यांच्याशी आणि अर्थातच साहेबांशीही गेली सुमारे पंचवीस वर्षे जोडला गेलोय. आयुष्याला दिशा देणाऱ्या आणि जीवनाचा खरा अर्थ समजणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या. आर्थिक लाभासाठी नेत्यांचा उदोउदो सगळेचं करतात पण सामाजिक अभिसरणाच्या चळवळीत त्यांच्या बरोबर जोडला गेल्याने जो अनुभव व सन्मान मिळत आहे त्यांचं मोलं शब्दात व्यक्त करता येणार नाही.
दोन महिन्यापूर्वीच सौ. उमा मॅडम यांची इप्को,जपान टोकियो कंपनीच्या संचालक पदी व सीएसआर कंपनीच्या अध्यक्षपदी त्यांची अभिनंदनीय निवड झाली. प्रचंड बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, कामातील शिस्त आणि सातत्य यामुळेच उमा ताईनी आपल्या कर्तुत्वाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. गोमंतकभूमीच्या या कन्येचं आणि सिंधुदुर्गच्या या कर्तुत्ववान स्नुषेचं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मन:पूर्वक अभिनंदन!
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————