*मुख्यमंत्री शिंदेंपासून ते सिनेविश्वातील कलाकार रंगले रंगांच्या दुनियेत*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
देशात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा तिथी आणि मुहूर्ताच्या संभ्रमामुळे दोन दिवस रंगांचा सण साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी होलिका दहन काल म्हणजेच सोमवारी तर काही ठिकाणी मंगळवारी होलिका दहन करण्यात आले. देशात आजपासून अनेक भागात रंगांचा उत्सव सुरू झाला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते सिनेकलाकारांपर्यंत रंगांची उधळण मोठ्या उत्साहाने झाली. सर्वांनीच होळीचा सण उत्साहात साजरा केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह ठाण्यात होळी साजरी केली. ते म्हणाले की मी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रंगांचा पाऊस येवो. सर्वजण पर्यावरणपूरक होळी साजरी करत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे.
तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी होलिका दहन कार्यक्रमात भाग घेतला. यादरम्यान त्यांनी होलिकाही पेटवली. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होलिका दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शबाना आझमी आणि जावेद अख्तर दरवर्षी त्यांच्या जुहू निवासस्थानी एक भव्य होळी पार्टी आयोजित करतात, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित असतात. यंदा फरहान अख्तरसोबत त्याची पत्नी शिबानी दांडेकर, सतीश कौशिक, जुही बब्बर, अनुप सोनी, दिव्या दत्ता, अली फजल, रिचा चढ्ढा, महिमा चौधरी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि इतर मंडळी होळीच्या पार्टीत उपस्थित होते.
भारतीय संघ होळीच्या मुहूर्तावर अहमदाबाद कसोटीच्या तयारीत व्यग्र आहे. इंदूरमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना अहमदाबाद कसोटी जिंकून मालिका जिंकण्याची इच्छा आहे. त्यामुळे संपूर्ण संघ पुढील सामन्याच्या तयारीत आहे. दरम्यान, संघ बसमध्येच खेळाडूंनी होळी साजरी केली.
महाराष्ट्रात होळी साजरी करताना लोक रंगात रंगून गेले होते. सर्वांनी उत्साहाने रंगांच्या उत्सवात सहभाग घेतला आणि एकमेकांसोबत खेळले.
मंगळवारी मुंबईत होळीनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी पिचकऱ्यांनी रंग भरून एकमेकांना रंगांची आंघोळ घातली. राजकीय दिग्गजांवर होळीचा रंग चढला होता. होळीच्या निमित्ताने लोकांनी मनमुरादपणे रंग खेळले. स्त्री-पुरुष, लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सारेच रंगांत न्हाऊन गेले होते.
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————