राज्यातील काही भागात पुढील तीन-चार तासात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुण्याच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख वैज्ञानिक के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. आज सकाळपासूनच पश्चिम भागात जोरदार वारे वाहू लागले आहे. तर मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. कोल्हापुरातही आज पहाटे पासून सुसाट्याचा वार सुटला आहे. यामुळे वातावरण गारवा जाणवत आहे.