बांदा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव सन्मान पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील कास नं.१शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. स्वाती पाटील यांना देण्यात आला.
कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या३२ गुणवंत महिलांच्या अलौकिक कार्याप्रती हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
यावेळी साहित्यिका व ज्येष्ठ विचारवंत सुजाता पेंडसे,जर्नालिस्ट फौंडेशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षा मनीषाताई लोहार, जर्नालिस्ट फौंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार आदि मान्यवर उपस्थित होते.
स्वाती पाटील या मुळच्या कोल्हापूर चंदगड शिवनगे येथील असून गेली १७ वर्षे त्या सावंतवाडी तालुक्यात शिक्षक म्हणून सेवा करत असून त्यांनी यापूर्वी निगुडे व सध्या कास नं.१ शाळेत कार्यरत असून शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनवले आहे तसेच लोकसहभागातून शाळेचा विविध भौतिक गरजा पूर्ण केल्या असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यकरत असून उमेद फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य करत आहेत.
स्वाती पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.