कणकवली
तालुक्यातील असलदे येथील श्री. देव रामेश्वर मंदिर व डामरेवाडी श्री साई मंदिरतील दानपेटी फोडत चोरट्याने चोरी केली. त्याचबरोबर असलदे गावठाण येथील प्राथमिक शाळांच्या ऑफिस मधील कपाट फोडून त्यातील कागद पत्रे अस्तव्यस्त करून चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे.
दरम्यान, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी शाळेत आल्याने दरवाजा, कपाटे फोडलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे चोरी लक्षात आले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी शाळेच्या व्हरांड्यात बसून मद्य पिऊन बॉटल त्याच ठिकाणी टाकल्या आहेत.
मंदिर व शाळांमध्ये चोरी झाल्याचे वृत्त समजताच, घटनास्थळी सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलीस पाटील सावित्री पाताडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे,अनिल नरे, महुल घाडी, श्यामु परब नरेश मिठबावकर यांच्यासह ग्रामस्थ दाखल झाले आहेत.