You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे एम. बी. बी.एस डॉक्टर उपलब्ध

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे एम. बी. बी.एस डॉक्टर उपलब्ध

डॉ. पोळ यांनी स्विकारला पदभार; शिवसेना ठाकरे गट ग्रा. प. सदस्य बाबू टेंबुलकर, ग्रा. प. सदस्य वंदेश ढोलम यांच्या मागणीला यश

मालवण

कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन एम. बी. बी.एस डॉक्टर उपलब्ध करून देण्याची सूचना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कट्टा ग्रामीण रुग्णालयासाठी एक
एम बी बी एस डॉक्टर उपलब्ध करून दिले.

कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे असलेले डॉक्टर रजेवर गेल्याने गेले ४ महिने याठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. कट्टा येथे ग्रा. प. सदस्य बाबू टेंबुलकर,ग्रा. प. सदस्य वंदेश ढोलम यांनी आ. वैभव नाईक यांच्या हि बाब निदर्शनास आणून दिली होती. तसेच कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी केली.

त्यानुसार आ. वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधत कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे कायमस्वरूपी एम. बी. बी.एस डॉक्टर उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यावर सदर डॉकटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली पुढील आठवड्यात आणखी एक डॉक्टर उपलब्ध करून देतो असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले आज डॉक्टर पोळ यांचे कट्टा शिवसेना (ठाकरे गट) वतीने स्वागत करण्यात आले त्यावेळी कट्टा ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, वदेश ढोलम, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, यशवंत भोजणे आबा शंकरदास बंटी लुडबे राजू गावडे अनिल चव्हाण. भोजणे उपस्थित होते तसेच कट्टा पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी आमदार वैभव नाईक यांचे डॉक्टर उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार व्यक्त केले. अशी माहिती बाबू टेंबुलकर यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा