You are currently viewing मळगावातील “नेहा केक हाऊस” चे उत्साहात उद्घाटन…

मळगावातील “नेहा केक हाऊस” चे उत्साहात उद्घाटन…

विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती; किफायतशीर किमतीत सेवा मिळणार…

सावंतवाडी

मळगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या “नेहा केक हाऊस” चे आज सरपंच सौ. स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मळगाव पंचक्रोशीतील ग्राहकांना चांगली व दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास संचालिका नेहा बुगडे यांनी व्यक्त केला.
यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, माजी सरपंच अशोक बुगडे, सदस्य निकिता बुगडे, निकिता राऊळ, अनुजा खडपकर, स्वरूपा राऊळ, सोनल सावंत,उमेद अभियानाच्या अधिकारी रूपाली गुडेकर, सचिन नाईक, हेमंत पांगम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा