You are currently viewing आणि मी कलेक्टर झालो

आणि मी कलेक्टर झालो

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास पवार (अण्णा) लिखित अप्रतिम लेख*

*आणि मी कलेक्टर झालो*

मला कळतंय की मी जेंव्हा दहावा वर्ग पास झालो होतो तेव्हा मला असे वाटत होते की इतक्या टक्क्यांवर नोकरी सहज मिळते त्यामुळे मी हे विसरलो होतो की यश म्हणजे पंगतीतील खीर नाही की कोणीही यावं आणि घेऊन जावं. स्वतः वरचा विश्र्वास कायम सोबत होता आणि आहे सुद्धा. गावातील लोकांनी घरच्यांना सांगितले की पोरगा खूप हुशार आहे. शहरात शिकायला पाठवा कलेक्टर होईल. त्या वेळी कलेक्टर म्हणजे आजही तितकेच अवघड आहे जितके आहे. पण कलेक्टर म्हटले की स्फुरण यायचं. घरच्यांना सुद्धा वाटले की आपण सगळी जिंदगी अशिच काबाड कष्ट करून घालवली. निदान पोरगं शिकल तर घर पुढे जाईल म्हणून मला शहरात पाठवल. शहरात आलो तर कळल की आपण तर येथे जणू bach bencher आहे. कारण येथील प्रत्येक जण आपापल्या खूप हुशार समजायचा. बोलायची शैली गावरान असल्याने त्यांच्यात आपल जमत नव्हतं. या स्पर्धेच्या काळात मी पण एक स्पर्धक म्हणून उडी घेतली. मग काय दिवस रात्र फक्त अभ्यास आणि अभ्यास. स्पर्धा परीक्षा तयारी सुरु झाली तशी मोठं होण्यासाठी मी आव्हाने पेलण्यासाठी तयार केले स्वतःला. चार पाच वर्षांत इतकं वाचलं की पुस्तक हातात घेतले की सगळी पाने डोळ्यासमोर यायची. पण यश अजुनही मिळाले नाही. अजूनही तीच धडपड जी सुरवातीला असायची. अभ्यासाच्या नादात वेळ कधी निघून जायचा कळलच नाही. असे करत सात वर्षाच्या कालावधीनंतर घरच्यांना चिंता वाटायला लागली कारण आता कानावर वेगळ्याच गोष्टी पडत होत्या त्यांच्या. म्हणे कोणीतरी नापास झाल्याने फाशी घेतली असेच काहीतरी. त्यांनी मला सांगितले की घरी परत ये. माझे पेपर झालेले होते आणि मुलाखतीला जायचा दिवस होता हा. मुलाखतीत मला काही प्रश्न विचारले आणि शेवटी त्यांनी विचारले की जर तुमचा निकाल मनासारखा नाही आला तर. मी म्हटल की सर मी आठ वर्षापासून यासाठीच तयारी केली आहे. आणि तरीही जर अपयशी झालो तर त्यात काय. हा प्रवास आहे. कुठेतरी दुसरा मुक्काम असेल माझा.

असे म्हणुन मी बाहेर पडलो. तिन दिवसांनी माझा निकाल लागला आणि मी यशस्वी झालो होतो. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मी लगेच घरी फोन करून सांगितले आई बाबा खूप खुश झाले होते. शुभेच्छा देऊन घेऊन झाल्या. एका जागेसाठी दोन जण पात्र होते. मी तर फार स्वप्नांच्या दुनियेत जगत होतो. तो रुबाब ती ठसन आणि तो रुतबा मी अनुभवायला लागलो होतो. पण जेंव्हा अंतिम यादीत माझे नाव दिसले नाही तेव्हा मला धक्काच बसला. आणि मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. सर्व बिऱ्हाड गोळा करून एका थैलित भरले. जवळ असलेली तितकी पुस्तके मात्र पेटीत टाकून निवांत झोपलो. रात्री स्वप्नात कलेक्टर आले आणि म्हणाले कसा आहेस कलेक्टर? मी म्हटलं कसला आलाय कलेक्टर मी तर अंतिम यादीत नाही. कलेक्टर म्हणाला खुप मेहनत घेतली राजा तू पण शेवटी मला एकच निवडायचा अधीकार होता आणि तो मी बजावला. आता त्यात तुला जागा नाही मिळाली त्याबद्दल तक्रार करू नकोस. मी म्हटले तक्रार कशासाठी मी उद्या घरी गेल्यावर माझ्या बापाला ताठ मानेने सांगेल की मी कलेक्टर नाही झालो पण कलेक्टरचा पेपर पास आहे. कलेक्टर म्हणाला इतक्या माणसात एक शोधन पण मला कठीण होत आहे. सर्व गुणसंपन्न सगळेच असतात पण काहीतरी राहुन जाते जे मागे पाडते माणसाला. किती स्पर्धा आहे ह्याचा अंदाज घेणे कठीण झाले मला सुद्धा. कोणाची निवड होईल हे सांगता येत नाही आता. असेच काहातरी गप्पा मारत मी रात्र काढली आणि सकाळी घराकडे निघून गेलो. मी हरवलं थोड पण कमावलेलं खूप शिल्लक होत. लोकांच्या मनात एक जागा बनवली होती मी. एक दिवस असा काहीसा उदास होऊन वडाच्या झाडाखाली निवांत बसलेला होतो. आता साध्य होईल असे काही शिल्लक उरलेले नव्हते माझ्याकडे. घरी काही दिवस झाल्यानंतर मला एक पत्र आलं त्यात माझी नियुक्ती कलेक्टर साठी झाली होती. कारण अगोदरच्या मुलाने पोलीस अधिक्षक म्हणुन पदभार सांभाळला होता. आणि मी कलेक्टर म्हणून.

#शब्दांचा जादुगार
@रामदास आण्णा
7987786373

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा