बांदा
जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत इयत्ता चौथीत शिकणारी विद्यार्थीनी कुमारी सर्वेक्षा नितिन ढेकळे हिची शाळेबाहेर ची शाळा या उपक्रमांतर्गत नागपूर आकाशवाणीवरून मुलाखत प्रसारित झाली.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच प्रथम एज्युकेशन संस्थेच्या वतीने गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांसाठी थोडी मस्ती थोडा अभ्यास या उपक्रमांतर्गत शाळे बाहेरची शाळा हा उपक्रम सुरू असून सर्वेक्षा व तिची आई स्नेहलता ढेकळे यांची ४२१व्या भागात गणित विषयातील भागाकार या घटकांवर मुलाखत संपन्न होऊन ही मुलाखत नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित झाली.
सर्वेक्षाच्या या निवडीबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर, सरपंच प्रियंका नाईक, केंद्रप्रमुख संदीप गवस ,विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले.
सर्वेक्षाला ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये , वर्गशिक्षिका शितल गवस,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे,जागृती धुरी, प्राजक्ता पाटील,जे.डी.पाटील , रंगनाथ परब, प्रशांत पवार,गोपाळ साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.सर्वेक्षाच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.