You are currently viewing माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांची जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात चर्चा..

माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांची जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात चर्चा..

ओरोस :

माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी यांच्या दालनात ही बैठक झाली.

यावेळी प्राधान्याने नरडवे धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करण्यात आली. नरडवे धरण प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासून २५ वर्षे पूर्ण झाली, तरी प्रकल्पबाधीत ग्रामस्तांच्या समस्या अजून सुटल्या नाहीत. आधी पुनर्वसन व मग धरण. २०२४ पर्यंत घळभरणी करण्यासाठी धरणग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याची विनंती ब्रिगे. सुधीर सावंत मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. प्रकल्पाला २५ वर्षे उलटूनही धरण ग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शेतकरी पर्यायी शेत जमिनीसाठी मागणी करत आहेत. परंतु ही यादी अपूर्ण असून बऱ्याच शेतकऱ्यांची नावे या यादीतून वगळण्यात आली आहेत. १९९९ च्या संकलनामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेतकरी सतत मागणी करत आहेत. त्यामध्ये अद्याप दुरुस्ती झालेली नाही. निवासी भूखंड वाटप बाबत ग्रामस्थांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.

नवनगर प्राधिकरण मधील रहिवाशी संघातर्फे मागणी केलेले भोगवटदारांची जमिन वर्ग १ करणे, भूखंड धारकांना ७/१२ देणे, प्राधिकरण क्षेत्रातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, वसाहतीमधील रस्ते, पथदिप, विरंगुळा केंद्र, दिशा दर्शक फलक, उद्यान, दलदल व्यवस्थापन, बस फेऱ्या इत्यादी विकास कामांच्या मागण्याबाबत सकारात्मक चर्चा जिल्हाधिकारी यांचे बैठकीत करण्यात आली. १९९८ पासून प्राधिकरण मधील रहिवाशी नागरिकांना योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. ब्रिगे. सुधीर सावंत राज्य सरकारकडून निधीची मागणी करून कामे होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ओरोस हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी बनवली पाहिजे, असे मत ब्रिगे. सुधीर सावंत यांनी व्यक्त केले.

मालवण तालुक्यातील देवबाग किनाऱ्यावरील जमिनीची धूप होत असल्याने गावाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. त्यासंबंधी विकास आराखडा बनविण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये प्लोटिंग जेटी, देवबाग मुख्य रस्ता रुंदीकरण, समुद्र किनारी बंधारा, त्सुनामी आयलँड, भूमिगत वीज पुरवठा, तसेच कुडाळ तालुक्यातील घावनळे गाव जलजीवन योजना इत्यादी विकास कामांची सकारात्मक चर्चा माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांनी जिल्हाधिकारी यांचे सोबत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा