प्राधिकरण निगडी -प्रतिनिधी)
कला आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शब्दरंग साहित्य, कला कट्टा संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला.
कॅप्टन कदम सभागृह,सावरकर सदन निगडी येथे हा कार्यक्रम पार पडला. नटराज प्रतिमा , स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतमाता प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
गणेश वंदना आणि प्रार्थना झाल्यावर शब्दरंगचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांनी प्रास्ताविक केले. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी स्थापन झालेल्या शब्दरंगचा प्रवास त्यांनी उत्तम प्रकारे उलगडला .यावर्षी कट्ट्याने तब्बल ४४ कार्यक्रम केले.त्यात विविध कार्यक्रमांचा समावेश होता.
विविध स्पर्धा,पथनाट्य,जनजागृती,मनोरंजन अशा विविध माध्यमातून कार्यक्रम सादर झाले .त्यात ६ नोव्हेंबर २२ रोजी एस एम जोशी सभागृहात झालेला पुलं वरचा कार्यक्रम,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी केलेले पथनाट्याचे प्रयोग, कलापीनी तळेगाव, रंगगंध कलासक्त न्यास,चाळीसगाव, ॲस्कॉप पुणे, यांच्या तर्फे आयोजित अभिवाचन स्पर्धेत सहभाग असे अनेक कार्यक्रम शब्दरंगने केले .शब्दरंगच्या वैशिष्ट्यपूर्ण मानचिन्हाचे अनावरण या प्रसंगी झाले.
सौ ज्योती कानेटकर यांची नूतन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा , श्री. चंद्रशेखर जोशी यांनी केली.
श्री चंद्रशेखर जोशी,सुभाष भंडारे,आनंदराव मुलूक,माधुरी ओक,प्रियांका आचार्य हे सर्व कोअर कमिटी सदस्य , यापुढेही कोअर कमिटीत काम करतील असे ज्योती कानेटकर यांनी जाहीर केले.
शब्दरंगच्या सर्व कलाकारांनी मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. भारुड,गवळण,एकपात्री,कथाकथन टाळ नृत्य,लेझी डान्स,गाणी,प्रहसने,कविता अशा विविध रंगी कार्यक्रमांचा समावेश होता.
मंडळाच्या कार्यक्रमाचा आढावा घेणारी एक ध्वनिफीत ही यावेळी दाखवण्यात आली . यासाठी,सतीश सगदेव,सुभाष भंडारे,चंद्रशेखर जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास मा. नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे, नामवंत साहित्यिक, तसेच अनेक मान्यवर, पत्रकार मंडळी यांनी उपस्थिती लावली.