You are currently viewing मांगेली येथे मुख्य विद्युत लाईन तुटून काजू कलमांचे नुकसान

मांगेली येथे मुख्य विद्युत लाईन तुटून काजू कलमांचे नुकसान

दोडामार्ग

मांगेली तळेवाडी येथे ११kv मुख्य विद्युत लाईनची वायर तुटून आग लागल्याचे सुमारे ५०० काजू रोप जळून खाक.यात यशवंत लाडू गवस, तुकाराम यशवंत गवस, गोपाळ कृष्णा गवस,फटी विठू गवस याचे नुकसान झाले.एन काजू मोसमाच्या तोंडावर काजू बागायतदारांना नुकसानास सामोरे जावे लागले आहे.विज प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही विद्युत खांब व जीर्ण वाहिन्यांकडे विज‌ प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी व झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा