You are currently viewing ठाणे येथे होणार नि:शुल्क मराठी गझल लेखन कार्यशाळा

ठाणे येथे होणार नि:शुल्क मराठी गझल लेखन कार्यशाळा

*ठाणे येथे होणार नि:शुल्क मराठी गझल लेखन कार्यशाळा*

ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) :

गझल मंथन साहित्य संस्था व आम्ही सिद्ध लेखिका समुह आयोजित एक दिवसीय नि:शुल्क मराठी गझल लेखन कार्यशाळा तसेच मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ ते ५ ह्या वेळेत वारकरी भवन, ३रा मजला, राममारुती रोड, गजानन महाराज मंदिराच्या जवळ आयसीआयसीआय बँकेसमोर ठाणे (पश्चिम) येथे सदर कार्यशाळा घेण्यात येणार असून यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येणार असल्यामुळे गझल लेखन शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी 9819725658 या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाॅटसॲपद्वारे नाव नोंदणी करावी.

पहिल्या सत्रात होणाऱ्या गझल लेखन कार्यशाळेत सुप्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे सर आणि स्नेहल कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात मान्यवर महिला गझलकारांचा मुशायरा होणार आहे.

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला सहभाग प्रमाणपत्र तसेच प्राविण्य प्राप्त करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे, असे गझल मंथन साहित्य संस्थेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मानसी जोशी यांनी कळवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा