*काव्य निनाद साहित्य मंच, पुणे समाजाच्या सदस्या लेखिका कवयित्री शुभांगी गायकवाड लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मायबोली माझी मराठी*
महाराष्ट्राच्या कणाकणातूनं
निनादले तिचे गुणगानं
मराठी मायबोली झाली
प्रत्येक ह्रदयात विराजमानं
मराठी माय बोली माझी
महाराष्ट्राची राज्यभाषा
असे इथे साहित्याची खाणं
सदा नवनिर्मितीची अभिलाषा
विविध प्रांतात तिने धारीले
रूप रंग गंध जरी वेगळे
असे लोभस तिचे सौंदर्य
अन् माधुर्य असे आगळे
साज शृंगार,भाळी अनुस्वार
काना मात्रा वेलांटी ऊकार
आरंभ करी ती शुभकार्याला
वंदुनीया अधिपती ओंकार
मराठी माय बोलीच्या हाती
असे कलश अमृताचा नित्य
भक्तिभावाने प्राशन करता
जन्मे प्रतिभासंपन्न साहित्य
तेजाळते जणु हिरा कोहिनूर
लेखणी जणु भवानी तलवार
सांगे ज्ञानेश्वरी गीतेचे सार
जोपासे सान थोर साहित्यकार
अभिमानाने फुलते छाती
मायबोली माझी मराठी
करू अथक परिश्रम सारे
तिच्या चिरकाल समृद्धीसाठी
शुभांगी सुभाष गायकवाड
मुंबई