आंबोली
चौकुळ-कुंभवडे येथील चाळीस वर्षीय महिला गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. भारती भरत गावडे, असे तिचे नाव आहे. तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिलेच्या छातीला, पायाला, आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गवारेड्याची ठोकर एवढी जबरजस्त होती की महिला जाग्यावर बेशुद्ध पडली. तर महीलेचे मंगळसुत्र कुठच्या कुठे फेकले गेले. दरम्यान स्थानिक ग्रामस्थानी तिला १०८ रुग्णवाहीकेतून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.