You are currently viewing ।। श्रीगुरूंचा शोध लागला ।।

।। श्रीगुरूंचा शोध लागला ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्री अरुण वी देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकरमहाराज काव्य-चरितावली काव्यपुष्प- १६ वे -*

*।। श्रीगुरूंचा शोध लागला ।।*
—————————————-
हे येहळेगाव आहे कुठे, अंतर किती ?
श्रीमहाराजांनी याची चवकशी केली
कठीण होते गाठणे ,मजल भारी होती
परी गुरूभेटीची तळमळ अंतरी होती ।।

ई.स. १८५८-५९ चा काळ सारा तो
प्रवासा अजिबात अनुकूल ही नव्हता
पायी प्रवासा योग्य रस्ता स्थिती नव्हती
होती श्रीमहाराजांच्या मनाची निश्चयी वृत्ती ।।

पहिला मुक्काम पैठण ,पुढे औरंगाबाद
जालना प्रवासात एक योगी भेटला
मनशांती मिळण्या नामस्मरण कर
श्रीमहाराजांनी हा उपदेश त्यास केला ।।

नांदेडला आल्यावर गोदावरी स्नान झाले
तेथूनी निघून महाराज येहळेगावी पोंचले
म्हणे -कवी अरुणदास, इथेच जन हो
श्रीमहाराजांना “तुकामाई”गुरू भेटले ।।
—————————————
कवी-अरूणदास- अरुण वि. देशपांडे- पुणे
9850177342
—————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा