*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मृदगंधाचे श्वास!अव्यक्त ईश्वर!!*
अशी सुखासुखी नको घालमेल
मीच माझ्या मातीत गुलाब पेरतो
माझ्यात उतरलेलं ऊनही झाले सावळे
मीच मला नव्याने उगवलेलं पाहतो
ऋणानुबंधात ऋतुचक्रही गाभाळतोय
मृदगंधाचे श्वास मोजून मापून विसावले
ईश्वरी मापदंडात तुझ्या!मलाही नव्याने
उंच उंच झाडे खुजी वाटू लागले
स्पंदनाच्या पायघड्या घालता घालता
संवेदनांचा साक्षात्कार होऊ लागला
घातली पखरण ओंजळीत सोनकिरणांनी…….ईश्वरा..!!
निमिषभराचा विराम श्वासांना लाभला
चैतन्याचा अक्षय झरा स्फुरणरूपात
हळव्या कोप-यात गच्च भरून घेतो
वेळ हरवत चालली जरी माझी
तुझ्या स्पर्शातच अव्यक्त ईश्वर बघून घेतो
बाबा ठाकूर धन्यवाद