नगराध्यक्ष समीर नलावडे, अध्यक्ष मेघा गांगण यांचे सहभागी होण्यासाठी आवाहन
कणकवली
८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पदर महिला प्रतिष्ठान कणकवली मार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन कणकवलीत लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. यामध्ये ७ मार्चला रस्सीखेच स्पर्धा, पाककला स्पर्धा, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व स्पर्धा संध्याकाळी ४ वाजता सुरू होतील.
८ मार्चला नृत्य, गायन, कविता वाचन, एकपात्री आणि १६०० ते १८०० सालातील नामवंत महिलांची वेशभूषा करत फॅशन शो आयोजित केला आहे.
आई आणि मुलगी यांचा नृत्याविष्कार असेल तर त्यांना पारितोषिक देण्यात येईल. तसेच एक उखाणा एक बक्षिस देखिल देण्यात येणार आहे.
काबाडकष्ट करून उदरनिर्वाह चालवत असलेल्या ५ महिलांचे सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती साठी पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण ९४०४४४८९९९ यांच्याशी संपर्क साधावा. या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्सुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पदर प्रतिष्ठानचे संस्थापक नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी केले आहे.