You are currently viewing दोडामार्ग मध्ये लवकरच नाट्यगृह उभे राहणार – गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग मध्ये लवकरच नाट्यगृह उभे राहणार – गणेशप्रसाद गवस

25 लाखाचा निधी दीपक केसरकरांकडून उपलब्ध

दोडामार्ग

कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत लवकरच नाट्यगृह उभे राहणार आहे. त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपलब्ध करुन दिला आहे.शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी त्याबाबत माहिती दिली.
स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आतापर्यंत आमदार तसेच स्थानिक विकास निधी कार्यक्रम अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी कसई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी दिला आहे.आता कसई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात शासनाच्या राखीव जागेत सुसज्ज असे नाट्यगृह उभे राहणार आहे .त्यासाठी मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून व राज्यसरकारच्या नगरनियोजन विभागाकडून आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती श्री. गवस यांनी दिली.
तालुक्यात नाट्यगृह नाही. त्यामुळे कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळत नाही. तसेच तालुकावासीयांना नाटकांचा आनंदही घेता येत नाही. या नाट्यगृहामुळे तालुक्यातील अनेक कलाकारांना योग्य संधी मिळून त्याची कला नावारूपास येऊ शकते. त्याबद्दलही श्री. गवस यांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा