ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व सदस्या सौ.विशाखा काळे या दांपत्यांच्या मागणीला यश
वैभववाडी
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत श्री नवलराज काळे प्रभाग क्रमांक तीन मधून तर सौ विशाखा नवलराज काळे प्रभाग क्रमांक नंबर दोन मधून हे काळे दाम्पत्य बहुमतांनी निवडून आले त्यानंतर जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरिता ग्रामपंचायत व शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपताच एस टी महामंडळ व वाहतूक विभागीय कार्यालय कणकवली येथे 4 फेब्रुवारी 2023 रोजी निवेदनाद्वारे मानव विकास अंतर्गत चालू असलेली 08.30 ची गाडी वैभववाडी ते सडुरे पर्यंत चालू होती ती गाडी शिराळे पर्यंत यावी अशी मागणी केली होती. सदर गाडी शिराळे गावात जात नसल्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील शिराळे गावासहित प्रभाग क्रमांक दोन मधील सडूरे येथील तांबळघाटी, रुणझुणे,सोनधरणे या वाडीतील विद्यार्थ्यांना मानव विकास अंतर्गत गाडी पकडण्याकरिता सडुरे येथे 5 ते 6 किलोमीटर अंतर पायपीट करून यावं लागत असे. अन्यथा नंतरच्या गाडीमध्ये बसून यावं लागत असे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार महाविद्यालयात पोहोचणे शक्य होत नसे त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असे. यामुळे या दोन्ही प्रभागातील विद्यार्थी व पालक 8.30 ची गाडी शिराळे पर्यंत चालू करण्याबाबतची मागणी वारंवार करत होते. जनतेच्या मागणीनुसार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरिता काळे दाम्पत्यांनी ही बस सेवा चालू करण्याकरिता निवेदन देत बस सेवा चालू होण्या कामी पाठपुरावा केला व सदर असून मागणी केलेली एसटी बस सेवा 1 मार्च 2023 रोजी पासून शिराळे गावापर्यंत चालू झाली आहे. सदर गाडीची फेरी शिराळे येथे वाढवली असल्यामुळे सडुरे येथील कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊनच ही फेरी वाढवण्यात आली आहे गाडीच्या वेळापत्रक देखील थोडाफार बदल करण्यात आला आहे. सदर गाडी वैभववाडीतून सकाळी 08.20 वाजता सुटणार 08.55 ला शिराळे पोहचणार पुन्हा सडूरे शिराळेतून 09.05 ला सुटेल व 09.40 ला ती गाडी वैभववाडी येथे येईल असे नवीन वेळापत्रक मधे नमूद करूनच हा बदल करण्यात आला आहे. हा पाठपुरावा करत असताना काळे दांपत्ये यांना ग्रामपंचायत सदस्य प्रियांका पाटील यांच्या सहित ग्रामस्थ विद्यार्थी, एस टी महामंडळ अधिकारी कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले. सदर एसटी बस शिराळेमध्ये पोहोचल्यानंतर शिराळे गावातील जनतेने या गाडीचे फटाका लावून, गाडीला हार घालून स्वागत केले व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्य विशाखा नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका पाटील, माजी ग्रामपंचायत उपसरपंच सखाराम उर्फ बबन पाटील, विजय बाबाजी पाटील, माजी प्रभारी सरपंच संतोष पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य उर्मिला डेळेकर, हरिचंद्र पाटील, महेश डेळेकर नामदेव पाटील, चंद्रकांत डेळेकर, वाहन चालक पंढरी फाले, वाहक घाडीगावकर, प्रभाकर पाटील, अशोक पाटील,लक्ष्मी धामने,हिरवती पाटील,पार्वती डेळेकर,राजश्री धामने इतर ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गाडीतून काळे दाम्पत्य यांनी वैभववाडी ते शिराळे व शिराळे ते वैभववाडी असा प्रवास करून प्रवाशांना व विद्यार्थ्यांना नवीन गाडी फेरी चालू झालेल्याची व्यवस्थित माहिती दिली.