You are currently viewing सिंधुदुर्गातील दुध संकलन प्रतिदिन एक लाख लिटर होण्यासाठी प्रयत्न,जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू – मनिष दळवी

सिंधुदुर्गातील दुध संकलन प्रतिदिन एक लाख लिटर होण्यासाठी प्रयत्न,जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू – मनिष दळवी

नवोदित तरुणांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दुध संकलन व्हावे, यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. यासाठी आवश्यक असलेला कर्ज पुरवठा उपलब्ध करुन नवोदित व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा दावा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केला. माणगाव-निवजे येथील स्थानिक तरुणांनी हरियाणा येथून दुधाळ म्हैशी आणून दुग्ध व्यावसायात आपले पाय घट्टपणे रोवण्याचा प्रयत्न केला आहे. संबधित नवोदित व्यावसायिकांना जिल्हा बँकेकडुन कर्ज पुरवठा देण्यात आला आहे. या प्रकल्पांना बँकेचे अध्यक्ष श्री. दळवी यांनी आज भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी संचालक प्रकाश मोर्ये, महेश सारंग, गजानन गावडे, सरपंच सौ.पालव, दीपक नारकर, नागेश आईर, प्रभाकर सावंत, डॉ.प्रसाद देवधर, गोकुळ दूध संघाचे सर्व अधिकारी ,व नीवजे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी दळवी यांनी सह्याद्री पट्ट्यातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय साठी पुढे येऊन हरीयाणा येथुन दुधाळ जनावरे खरेदी करुन दुग्ध व्यवसाय सुरु केला हे कौतुकास्पद असून तरुण व ज्येष्ठ नागरिक या व्यवसायात उतरता आहेत. म्हणजेच हा व्यवसायाला शाश्वत व या व्यवसायात यशस्वी होण्याची खात्री आहे. जिल्हा बॅंकेने गोकुळ दूध संघ,भगीरथ प्रतिष्ठान यांच्या सहकार्यांने जिल्ह्यात प्रती दिन एक लाख लिटर दुध उत्पादन करण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाच्या पुर्ततेच्या दिशेने निवजेतील शेतकर्ऱ्यांच्या माध्यमातुन ही झालेली सुरुवात आहे. निवजे गावातील हा प्रकल्प जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरेल गोकुळच्या माध्यमातून जनावर खरेदी,गोठा व्यवस्थापन,चारा,आदी अनेक बाबतीत येथील शेतकऱ्यांना अनुदानाच्या योजना असुन त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ आदीच्य सहकार्याने काही पात्र शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक सक्षम होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सदैव तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वासही श्री. दळवी यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =