*नाट्य परिषदेच्या निवडणुकीला उत्तम प्रतिसाद*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीकडे महाराष्ट्रातील रंगकर्मींचे लक्ष लागलेले असताना अर्ज भरण्यास रंगकर्मींचा उत्सह दिसून आला आहे. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.
उमेदवार ऑनलाईन अर्ज रात्री १२ वाजेपर्यंत भरू शकत असल्यामुळ सायंकाळी साडेसात नंतर किती अर्ज आले ते नंतर कळणार आहे. आतापर्यंत एकशे चाळीस अर्ज आले असून अर्जांची छाननी ३ मार्च रोजी होईल. दोन्ही निर्माते संघ यांच्या प्रतिनिधीनी अर्ज भरलेले असून कार्यकारणीतील सदस्यांनी अर्ज भरलेले असून आणि त्यात नाही म्हणणारीसुद्धा मंडळी आहेत, असं खात्रीलायक वृत्त आहे. अर्जाच्या पाठीमागचे रंगकर्मी कोण आहेत त्याचा उलगडा ३ मार्च रोजी होईल.
या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “यंदा १४० अर्ज आले असले तरी ऑनलाइन अर्ज रात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये १७० अर्ज आले होते. १४ मार्चला निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. १६ एप्रिल रोजी होणार असून मतदान सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार आहे.