You are currently viewing वीज दरवाढीचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करा…

वीज दरवाढीचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करा…

देवगडातील व्यापा-यांची ऊर्जा मंत्र्यांकडे मागणी; प्रशासनाला निवेदन सादर…

देवगड

महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव पुर्णपणे रद्द करण्यात यावा व राज्यातील वीज दर कमी करून अन्य राज्यांतील दरांच्या तुलनेने स्पर्धात्मक पातळीवर आणण्यात यावा, अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघ व देवगड तालुका वीजग्राहक संघटनेच्यावतीने ऊर्जामंत्री त्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसिलदार स्वाती देसाई व वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एन्.एन्.शेख यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, तालुकाध्यक्ष शैलेश कदम, देवगड तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष दिनेश पटेल, शामराव पाटील, आनंद कुळकर्णी, लहरीकांत पटेल, द्विगविजय कोळंबकर, सुरेंद्र चव्हाण, निळकंठ पाटील, वैभव करंगुटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा