You are currently viewing सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर स्थानिक डी.एड धारकांना संधी द्या – योगेश धुरी

सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर स्थानिक डी.एड धारकांना संधी द्या – योगेश धुरी

युवा सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर…

कुडाळ

सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर तात्काळ भरती करून त्या ठिकाणी जिल्ह्यातील स्थानिक डी.एड धारकांना संधी द्यावी, अशी मागणी युवा सेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान सद्यस्थितीत जिल्हयात ५७६ हून अधिक पदे शिक्षकांची रिक्त आहेत. तर बदली होऊन जाणाऱ्यांना कार्यमुक्त केल्यास हीच संख्या १००० च्या वर जाणार आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही लवकरात-लवकर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत आज त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

त्या निवेदनावर युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, योगेश तावडे, तानाजी पालव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ५७६ जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे डी.एड पदवीधारक तरुणांच्या बेरोजगारीचा आकडा सुद्धा मोठा आहे. या रिक्त पदावर जिल्ह्यातील युवकांना संधी दिल्यास यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटू शकतो. तसेच बदली होऊन जाणाऱ्या पर जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. ती कार्यवाही झाल्यास आणखीन बरीचशी पदे रिक्त होणार आहेत. आणि त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड धारकांना होईल. तरी या संदर्भात सकारात्मक ती भूमिका घेऊन आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा