*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगरचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काय…करावे…!*
जळता … जळत नाही…
काय कारावे,सरपनाचे…!
दिवे माणसुकीचे,पेटत नाही
काय करावे, वातीचे…!
आधंळा शोधूंन, रस्ता पाहे…
काय करावे, डोळ्याचे…!
कुठे जाते,अन्न वाया…
काय करावे, भुकेचे…!
सुखले जीव, थेंबा साठी…
काय करावे, सागराचे…!
गरर्दित…, मी हरपलो…
काय करावे, एकांताचे…!
ते जाळे… गीळले किती…
काय करावे, टाकणाऱ्याचे…!
लिहीत जातो, गझल इथे…
काय करावे, कागदाचे….!
……………………………..
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलडाणा
7875701806