भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
कुडाळ
भाजपा दिंव्यांग आघाडीची जिल्हा कार्यकारणी बैठक कसाल येथिल सिद्धीविनायक हाॅल मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस तथा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .
सर्वप्रथम दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले , त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली .
यावेळी दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी पक्ष वाढीसाठी करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला , त्याप्रमाणे काम करत असताना येणाऱ्या अडचणी जिल्हाध्यक्षांसमोर मांडल्या . तसेच आगामी काळात शासनाच्या वेगवेगळया योजना दिंव्यांगांना मिळाव्यात अशी मागणी केली .
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिंव्यांग आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करून , आपल्या कार्याची दखल पक्ष नक्कीच घेईल असे अभिवचन दिले . तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत दिव्यांगांसाठी जिल्हा नियोजन मधुन जास्तित जास्त निधी देणार असल्याचे सांगितले . तसेच दिव्यांगांंचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत सोडविण्यात येतिल अशी ग्वाही दिली .
यावेळी पक्ष बांधणीच्या दृष्टीने विविध पदाधीकारी यांची निवड करण्यात आली व त्यांना भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली . यामध्ये *मनोज सातोसे* यांची ५٪ शासकीय निधी प्रभारी म्हणून , *स्वाती राऊळ* यांची क्रिडा प्रभारी म्हणून , *भरत परब* यांची वैद्यकीय प्रभारी म्हणून , *सुधीर चव्हाण* यांची कुडाळ तालुका प्रभारी म्हणून , *सत्यवान पावले* यांची क्रिडा सह.प्रभारी म्हणून , *प्रशांत केळुसकर* यांची वेंगुर्ले तालुका प्रभारी म्हणून निवड करण्यात आली .
यावेळी दिंव्यांग आघाडीचे सहसंयोजक शामसुंदर लोट , कोशाध्यक्ष दिक्षा तेली , प्रकाश वाघ , विजय कदम , प्रकाश सावंत , सिताराम पंडित , मनिषा भगत , नम्रता राणे , शलाका पालव , जयश्री मेजारी , आदिती राणे , गजानन हरमलकर , संतोष झोरे , सदानंद मोरये इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते .