You are currently viewing कोलगाव येथील पं. दीनदयाळ उपाध्याय ग्रामविलगीकरण कक्षाचे उद्या उद्घाटन

कोलगाव येथील पं. दीनदयाळ उपाध्याय ग्रामविलगीकरण कक्षाचे उद्या उद्घाटन

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची उपस्थिती

सावंतवाडी
कोलगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील पाटीदार समाज हॉल मध्ये सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्राम विलगीकरण कक्षाचे उद्घाटन भाजपाचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या हस्ते सोमवार १४ जुन रोजी दुपारी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती कोलगांव सरपंच संतोष राऊळ यांनी दिली आहे. कोलगाव गावामध्ये वाढते कोरोना रुग्णांचे प्रमाण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली आली असल्याचेही सरपंच राऊळ यांनी सांगितले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − three =