You are currently viewing यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

सावंतवाडी :

 

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘मराठी राजभाषा दिन’  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे रजिस्ट्रार प्रसाद महाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व प्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली..मराठी दिनाचे औचित्य साधून कॉलेजच्या लायब्ररी विभागातर्फे मराठी कॅलिग्राफी व शब्दचित्र गुंफण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती..यामध्ये विद्यार्थी गटातून शब्दचित्र गुंफण स्पर्धेत केदारनाथ राजन गवस याने प्रथम, वैष्णवी विनायक तळेकर हिने द्वितीय व अर्पिता लक्ष्मण गावडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मनीष तुषार राऊळ व चैताली नित्यानंद मेस्त्री यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. मराठी कॅलिग्राफी स्पर्धेत विद्यार्थी गटातून अथर्वा आनंद परब हिने प्रथम, सावनी शशिकांत जाधव हिने द्वितीय तर अक्षय बापू झोरे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. चिन्मय नाईक व भिवा जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.शब्दचित्र गुंफण स्पर्धेतील कर्मचारी गटामध्ये नितीन विलास सांडये यांनी प्रथम, प्रा.हवाबी समद शेख यांनी द्वितीय तर प्रा.नेहल नितीन सांडये यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्वप्निल गोपाळ परब व देवानंद राऊळ यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल मानसी कुडतरकर, ग्रंथालय सहाय्यक शरद घारे व जानू पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा