कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
सिंधुदुर्गनगरी
मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय, यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी वी.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, संदिप शिंदे, प्रतिभा ताटे व किशोर कांबळे यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी भाषा साहित्यिक यांच्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय येथे करण्यात आले आहे. सदरचे प्रदर्शन सर्वांसाठी दि. 1 मार्च 2023 पर्यंत खुले राहणार आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत ही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून शाळा वाचनालयात कथाकथन, मराठी गाण्यांच्या गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषेचे विविध प्रकारचे फलक लावून प्रसिध्दी करण्यात आली. तसेच जिल्ह्यामध्ये मराठी गैरव दिनानिमित्य विविध प्रकारच्या मराठी भाषेच्या स्पर्धा, पुस्तके व कोश ग्रंथालयामध्ये वाढविण्यासाठी व्याख्याने इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.