You are currently viewing गुणाजी सावंत यांची उद्या नियतकालीन निवृत्ती

गुणाजी सावंत यांची उद्या नियतकालीन निवृत्ती

अजित नाडकर्णी,सवंगडी ग्रुप तर्फे त्यांना निवृत्तीच्या शुभेच्छा!!

कणकवली

अजित नाडकर्णी,सवंगडी ग्रुपचे मित्र गुणाजी सावंत हे ता.२८/२/२०२३ रोजी वयोमानानुसार निवृत्त होणार आहेत. त्यांचा कार्यकाल वेंगूर्ला या ठिकाणी पोलीस हवालदार म्हणुन सुरु झाला. प्रामाणिक काम हा त्यांचा गुणधर्म असल्याने ते प्रगतीपथावरच राहीले. त्या नंतर ते परीक्षा पास होवुन पी.एस.आय.पदावर मुंबईत रुजु झाले.फोंडाघाट मधील सर्व शिक्षण फोंडाघाट न्यु.इग्लिश स्कुल मध्ये झाले. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचे मित्र आज पोलीस डिपार्टमेंट मधील अती उच्च ए.सी.पी A.C.P.या पदावरुन निवृत्त होतोय याचा सार्थ अभिमान त्यांना आहे. फोंडाघाटचे नांव उंच करायचे काम गुणाजी सावंत यांनी केले आहे. सर्व पोलीस यंत्रणेतील अतीउच्च कामे यांनी केल्यानेच पोलीस आयुक्तानी त्यांना ३ वर्षापुर्वी A.C.P. पदावर नियुक्ती करुन अती संवेदन शील ओरंगाबाद मध्ये त्यांनी प्रशासकीय काम केले.त्यानंतर त्यांची चर्चगेट A.C.P. म्हणुन कामगीरी बजावली.१२ वीत असताना माझा कुणा म्हणु मी नाटकातही अप्रतीम काम केले.फोंडाघाट मध्ये त्यांची नाळ जोडलेली असल्याने ते सुट्टी काढुन ते यायचे आमचे सर्व मित्रमंडळात रमत. सवंगडी ग्रुप मध्ये ते सर्कीय असत.सतत ३ वेळा झालेल्या गेट टु गेदरला ते आर्वजुन उपस्थित होते.त्यांच्या पत्नीनीही आमचीच वर्ग मैत्रीण आणि सवंगडी मध्ये असलेने तीने ही साथ दिल्याने त्यांच्या प्रगतीत तिचाही सहभाग आहे.

सर्व सवंगडी ग्रुप तर्फे श्री.गुणाजी सावंत यांच्या निवृत्तीला शुभेच्छा!! भावी आयुष्य सुखसमृध्दीचे आणि अरोग्यमय जावोत हिच श्री.गांगोमाऊली कडे प्रार्थना अजित नाडकर्णी,सवंगडी ग्रुपने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =