*भाजपच्या ‘सेल्फी विथ बेनिफिशियरी’ अभियानाला आज सुरुवात*
नवी दिल्ली :
लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर महिला मतदारांतील पकड कायम ठेवण्यासाठी भाजप ‘एक काेटी सेल्फी विथ बेनिफिशियरी’ अभियानाला सुरुवात करणार आहे. भाजप महिला माेर्चाच्या अध्यक्ष वनिथी श्रीनिवासन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या हस्ते अभियानाची सुरुवात साेमवारी सायंकाळी चार वाजता हाेईल. महाराष्ट्रात त्याची सुरुवात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हाेईल. कार्यकर्त्यांना नमाे अॅपवर काही माहितीसह सेल्फी अपलाेड करावी लागेल.सर्व राज्यांच्या जिल्हा मुख्यालयांवर हे अभियान एकाच वेळी सुरू हाेईल. प्रत्येक कार्यक्रमासाठी किमान ५०० लाभार्थींना निमंत्रण दिले आहे. हे अभियान फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू राहील. अभियानांतर्गत भाजपच्या महिला कार्यकर्त्या उज्ज्वला, आयुष्मान भारतसारख्या याेजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाेबत सेल्फी घेतील. त्यासाठी भाजप महिला माेर्चाच्या कार्यकर्त्यांना तालुका पातळीपर्यंत प्रशिक्षण देईल.
*भाजप १० लाख मतदान केंद्रांना आणखी बळकट करणार*
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी पक्षाच्या सरचिटणीसांची बैठक घेतली. या दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. भाजपच्या सूत्रांनुसार, मुख्य अजेंडा आणि फोकस संघटन बळकट करण्यावर राहिला. ६ राज्यांतील निवडणुकांवर चर्चा झाली. यासोबत देशभरातील १० लाख मतदान केंद्रांवर पक्षाला आणखी बळकटी आणण्यासाठी मोहीम चालवण्याचे ठरले आहे.