वेंगुर्ले
मदर तेरेसा स्कूल मध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला ह्या दिवसाचे औचित्य साधून रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उस्पूर्त प्रतिसाद लाभला. हि स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. या स्पर्धेला साठ पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अँथोनीसा फर्नांडिस उपस्थित होत्या
. प्रशालेच्या लहान मुलांनी विवध कार्यक्रम सादर केले. व त्यातून मराठी भाषे बद्दल आदर व तिचे महत्त्व पटवून दिले. तसेच श्री. प्रमोद काळसेकर , सौ. मयुरी माडकर व सौ. अँथोनीसा फर्नांडिस यांनी मुलांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. सहभगी सर्व मुलांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर अँथोनी डिसोजा यांनी प्रमुख पाहुणे, सहभागी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने करण्यात आली.