You are currently viewing सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आशिष गेहालयान (१९) याने सोमवारी पहाटे तो राहत असलेल्या वसतिगृह इमारतीच्या एका खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मूळचा कर्नाल, हरियाणा येथील असलेला आशिष हा मागील वर्षभरापासून वसतिगृहात राहत होता. सध्या पहिल्या वर्षाची प्रॅक्टिकल सुरू आहेत. परीक्षेला सामोरे जात असतानाच त्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्याने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा