You are currently viewing भाजपा च्या वतीने ” मराठी राजभाषा दिनाचे ” औचित्य साधून जेष्ठ साहित्यिक अजीत राऊळ सर यांचा सत्कार

भाजपा च्या वतीने ” मराठी राजभाषा दिनाचे ” औचित्य साधून जेष्ठ साहित्यिक अजीत राऊळ सर यांचा सत्कार

वेंगुर्ले

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ” मराठी राजभाषा दिन ” म्हणून साजरा केला जातो. मायमराठीचा गौरव करण्याचा , आपल्या मातृभाषे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने जेष्ठ साहित्यिक अजीत राऊळ सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ नेते रामकृष्ण उर्फ बाळा सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
नोकरीच्या निमित्ताने मुंबईत असताना त्यांनी ” साहित्य दरवळ मंच ” या संस्थेची स्थापना केली व कविसंमेलने ,अभिवाचन , दिवाळी अंक प्रदर्शन व पुरस्कार , साहित्यिकांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले . प्रा.सुभाष भेंडे , डाॅ.विजया वाड, डाॅ.तुलसी बेहरे , नलेश पाटील , अशोक बागवे , साहेबराव ठाणगे , अरुण म्हात्रे , कवी सौमित्र अशा दिग्गज साहित्यिकांना आमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानांचे व कविसंमेलनाचे आयोजन केले.
महानगरपालिकेच्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित अजीत राऊळ यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असुन प्रासंगिक व स्फुट विषयावरील लेखन प्रसिद्ध आहे. विद्या व वाडःमय या विषयांना वाहिलेल्या विद्यादर्पण या त्रैमासिकाचे संपादन व प्रकाशन ते करीत असून सेवानिवृत्ती नंतर ते वेंगुर्ले येथील आनंदयात्री वाडःमय मंडळात उस्ताहाने कार्यरत असतात अश्या जेष्ठ साहित्यिकांना गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस , ता. सरचिटणीस प्रशांत खानोलकर , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नाडिस , सांस्कृतिक सेलचे शैलेश जामदार , प्रकाश नांदोसकर , महादेव केरकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा