You are currently viewing कणकवलीत ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर यांचा सत्कार…

कणकवलीत ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर यांचा सत्कार…

कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष वायगंणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री वायंगणकर व श्री लोके यांनी अशोक करंबळेकर यांच्याबद्दल आठवणीने उजाळा पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, लोकमत आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, माजी अध्यक्ष संतोष राऊळ, चंद्रशेखर तांबट, ओमकार ढवण, उमेश बुचडे यांच्यासह पत्रकार या छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + two =