You are currently viewing मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मराठी भाषा दिन* 🚩🚩

माझी माय मराठी
राखु तिचा आज मान
तीस आळवावु किती
तिचं मराठीची शान

माझ्या माय मराठीचा
मज वाटे अभिमान
संगणकाच्या युगात
तिची थोरवी महान

नजरेत तिची आस
भावनेत तिचा ध्यास
एक एक असे श्वास
मराठीचा नित्य भास

तिच्यासाठी शब्द नाही
जगात उपमा नाही
शब्दातुन ओसंडते
तिचं हृदयात राही

ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी
शब्दालंकाराचा साज
चला करु जयघोष
माय मराठीचा आज

संत तुकोबाची गाथा
आहे संस्कृती कळस
नाना भाषेहुन थोर
माय मराठी सरस

एकनाथाची भारुडे
जनाबाई गाते ओवी
शिव शाहीरही गाती
मराठीची ही थोरवी

डोंगर दरीत घुमतो
लोक संगीताचा नाद
रान पाखरे गुंजती
माय मराठीला साद

माझ्या माय मराठीत
लावणी ही झंकारते
नाद ऐकता डफाचे
पायी घुंगरू थीरकते

कृष्णा, नर्मदा, गोदाई
जलदायीनी सर्वदा
भुमी संतांची पावन
करु नमन शतदा

माझ्या माय मराठीचे
गुण गावु या खुशीत
सप्त जन्मातही घेवु
जन्म तिच्याच कुशीत

वि. वा. शिरवाडकर
साहित्याचा शिरोमणी
करु त्यांचा सन्मान
आज त्यांच्या जन्मदिनी

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा