You are currently viewing जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार, रिक्त पदे भरणार – दीपक केसरकर

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार, रिक्त पदे भरणार – दीपक केसरकर

सांगेली प्राथमिक केद्रांचे उद्घाटन,सह्याद्री-कोल्हापूर मार्ग लवकरच पुर्णत्वास…

सावंतवाडी

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच आरोग्य यंत्रणेत असलेली रिक्त पदे भरती केली जाणार आहेत. त्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री जिल्हा दौरा करणार आहेत, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान सह्याद्री पट्ट्याचा विकास व्हावा या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच सह्याद्री-कोल्हापूर हा मार्ग पुर्णत्वास येणार आहे, असे त्यांनी सांगितले. सांगेली प्राथमिक केद्रांच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आज ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. यावेळी श्री. केसरकर बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा