You are currently viewing व्हरेनियम कंपनीकडून सहकार्य; कचरा उचलण्यासाठी सावंतवाडीत नव्याने ”ई-कार्ट”..

व्हरेनियम कंपनीकडून सहकार्य; कचरा उचलण्यासाठी सावंतवाडीत नव्याने ”ई-कार्ट”..

सावंतवाडी :

 

सावंतवाडी नगर परिषदेला व्हरेनियम क्लाऊड या कंपनीच्या माध्यमातून ”ई-कार्ट” गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गाडी शहरातील अंतर्गत भागासह अडचणीच्या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी वापरात येणार आहे. आज कंपनीचे संचालक विनायक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही गाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी पालिकेच्या कार्यकालीन अधीक्षक आसावरी शिरोडकर, आरोग्य निरीक्षक रसिका नाडकर्णी, पांडुरंग नाटेकर, दीपक म्हापसेकर, विजय बांदेकर, आदी कर्मचारी उपस्थित होते.

सी. एस. आर. फंडातून ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतची मागणी सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून व्हरेनियम कंपनीकडे करण्यात आली आहे. त्यानुसार ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली, असे सौ. नाडकर्णी यांनी सांगितले. या गाडीच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत भागात तसेच डोंगराळ भागातील कचरा उचलण्यासाठी मदत होणार आहे. अडचणीच्या ठिकाणी ही गाडी सहज नेता नेणार आहे. ही गाडी आकाराने लहान असल्यामुळे कुठेही कचरा आणण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे त्याचा फायदा पालिकेसह नागरिकांना होणार आहे, असे नाडकर्णी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा