You are currently viewing अंध मुलांच्या सहलीचे सामाजिक बांधिलकीने केले सावंतवाडीत स्वागत …

अंध मुलांच्या सहलीचे सामाजिक बांधिलकीने केले सावंतवाडीत स्वागत …

सावंतवाडी

येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट पुणे येथून पन्नास अंध मुलांची सहल मालवण च्या समुद्राचा व किल्ल्याचा आनंद घेऊन सावंतवाडी गार्डनमध्ये मध्ये दाखल झाली त्यावेळी ज्येष्ठ साहित्यकार विठ्ठल कदम व शिक्षक मंडळी तसेच सामाजिक बांधिलकीच्या टीमने मुलांचे सावंतवाडी शहरांमध्ये सहर्ष स्वागत केले.दरम्यान विठ्ठल कदम व दत्तकुमार फोंडेकर यांनी मुलांच्या चहापाण्याची व्यवस्था केली तर सामाजिक बांधिलकीने मुलांना आईस्क्रीम चॉकलेट दिली.सामाजिक बांधिलकीची टीम व सावंतवाडीतील शिक्षक मंडळी मुलांच्या आनंदामध्ये सहभागी झाले होते मुलांनी छान अशी गाणी गायली तेव्हा  गार्डन मधील वातावरण आनंदमय झाले होते.

14 ते 16 वयोगटातील अंध मुलांमध्ये आत्मविश्वास आणि त्यांचे सहज रित्या वावरण्याची पद्धत प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारी होती.मुलांनी सावंतवाडीचे मोती तलाव, गार्डन राजवाडा व उभा बाजार येतील लाकडी खेळणी स्पर्शाने पाहण्याचा आनंद उपभोगला.

याप्रसंगी अंध मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वर्ग व शाळेची मुलं तसेच शिक्षक विठ्ठल कदम सर, कुमार फोंडेकर रामचंद्र दाभोळकर विनया कदम दीक्षा फोंडेकर मित्र मंडळ उपस्थित होते तर सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव संजय पेडणेकर, समीरा खालील, हेलन निबरे व प्रदीप ढोरे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा