You are currently viewing भारताच्या संस्कृतीत जैन धर्माचे मोठे योगदान – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा

भारताच्या संस्कृतीत जैन धर्माचे मोठे योगदान – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा

खारेपाटण येथील जैन मंदिरला भेट…

कणकवली

आपल्या भारत देशाच्या प्रगतीमध्ये विविध जाती धर्माचे, संप्रदायातील लोकांचे मोठे योगदान आहे. तसेच देशाच्या उत्थानात व संस्कारात जैन धर्माचेही मोठे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन केंद्रिय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी खारेपाटण येथील जैन बांधवांच्या मेळाव्यात बोलताना काढले.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्तरावरून लोकसभा प्रवास व जनतेशी संवाद ‘या उपक्रमा अंतर्गत खारेपाटण येथील प्रसिद्ध दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिरला केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी भेट दिली. यावेळी दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमाचे त्याच्या शुभहभस्ते दीपप्रज्वलन करून उद्धघाटन करण्यात आले. यावेळी येथील जनतेशी थेट संवाद साधत येथील अल्पसंख्यांक समूहाच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री अतुल काळसेकर, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कांदे कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, मनोज रावराणे, माजी जि.प. सदस्य सर्वश्री रवींद्र उर्फ ​​बाळा जठार, माजी पं. सहा सदस्या सौ.तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच सौ.प्राची इस्वलकर, संदीप लेले, अमित आवटी, खारेपाटण जैन समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.विलास डोरले, सुर्यकांत भालेकर, राजेंद्र ब्रम्हादंडे, सुधीर कुबल, ग्रा. पं. सदस्या सौ.मनाली होनाळे, शितिजा धुमाळे, अमिषा गुरुवा, धनश्री ढेकणे, श्री.किरण कार्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा