You are currently viewing अनपेक्षित

अनपेक्षित

*ज्येष्ठ लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा निगडी पुणे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अनपेक्षित*

 

वेळ कधी कशी बदलेल सांगता येत नाही

प्राक्तनात काय लिहीलेले सांगता येत नाही

 

असो भूकंप, पूर अपघात सांगता येत नाही

असो स्खलन,केव्हा अवर्षण सांगता येत नाही

 

भविष्य कारास जीवाची हमी देता येत नाही

चमत्कार की दैवी शक्ती ते सांगता येत नाही

 

कधी वादळे, कधी त्सुनामी सांगता येत नाही

आयुष्य दोरी कधी तुटेल सांगता येत नाही

 

कोण जगेल, कोण मरेल सांगता येत नाही

खेळ दैवाचा, कुणा कळेना जाणता येत नाही

 

-बाबू फिलीप डिसोजा

यमुनानगर, निगडी, पुणे-४११०४४

प्रतिक्रिया व्यक्त करा