You are currently viewing आचरा जामडूल येथील युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

आचरा जामडूल येथील युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

मालवण

आचरा जामडूल येथील समीर परशुराम आचरेकर (वय-३५ ) याचा मृतदेह काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या रहात्या घरातील देवघर खोलीत लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर त्याचे वडील परशुराम आचरेकर यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत वडीलांनी दिलेल्या जबाबानुसार समीरचे दोन वर्षापासून मानसिक संतूलन बिघडले होते. त्याच्यावर उपचार केले गेले होते. २ फेब्रुवारी पासून तो आचरा येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला होता. गुरुवारी नेहमी प्रमाणे दैनंदिन कामे आटोपून दुपारी देवघर खोलीत पोटात बरे नसल्याने झोपला होता. सायंकाळी पाच वाजता मुले क्लासला यायला झाली म्हणून त्याला उठवायला गेलो असता समीर गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत परशुराम आचरेकर यांनी ओरडा मारल्यावर लगतच्या माणसांनी धाव घेतली होती. खबर मिळताच घटनास्थळी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक उपनिरीक्षक महेश देसाई, पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, मनोज पुजारे, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, जिल्हा परीषद सदस्य जेरॉन फर्नांडिस आदी उपस्थित झाले होते.

अधिक तपास आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुकाराम पडवळ करत आहेत. समिर आचरेकर याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, बहिण असा परीवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा