कणकवली
कणकवली तालुक्यातील नांदगाव वैश्य समाजाच्यावतीने वैश्य समाज बांधव वधू वर सूचक मेळावा रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र शाळा नांदगाव नंबर 1 येथे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून या मेळाव्याला जवळपास मोबाइल व्दारे 350 वधू वर यांनी नोंदणी केलेली आहे. मेळाव्यासाठी जयत तयारी सुरू असून काम अंतिम टप्प्यात येत आहे.
या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य व बाहेरील राज्यातून वैश्य समाज बांधवांनी या वधू वर मेळाव्याला नोंदणी केली असून हा मेळावा मोठा भव्य दिव्य होणार असल्याचे नांदगाव वैश्य समाजाचे अध्यक्ष नागेश मोरये, उपाध्यक्ष पंढरीनाथ पारकर, सचिव ऋषिकेश मोरजकर सल्लागार गजानन रेवडेकर यांनी बोलताना सांगितले आहे.
सदर मेळाव्यात कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नसून पूर्ण मोफत नोंदणी झाली असल्याने व सर्वांची नाष्टा भोजनाची व्यवस्था ही केलेली असल्याने या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे.तसेच या मेळाव्यात ज्या वधू प्रत्यक्ष उपस्थित राहतील त्यांना अर्धा डझन कर्ण फुले देवून गौरविण्यात येणार आहेत.
या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजन तेली, पर्यटन विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सिंधुदुर्ग वैश्य समाज अध्यक्ष सुनिल भोगटे, सिंधुदुर्ग वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर,कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे,माजी नगराध्यक्षा मेघा गांगण ,गुरु मठ सिंधुदुर्ग अध्यक्ष अँड. दीपक अंधारी, नांदगाव सरपंच रविराज ऊर्फ भाई मोरजकर, कणकवली तालुका वैश्य समाजाचे अध्यक्ष दादा कुडतरकर, तसेच सर्व तालूक्याचे तालूकाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
तरी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन नांदगाव वैश्य समाजाचे अध्यक्ष नागेश मोरये, कार्याध्यक्ष शशिकांत शेटये उपाध्यक्ष पंढरीनाथ पारकर, सचिव ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.