You are currently viewing जलदुर्ग यशवंत गड किल्ला वाचविण्यासाठी शिवप्रेमींकडून करण्यात येणाऱ्या बेमुदत आमरण उपोषणास मनसे चा पाठिंबा- मनसे वेंगुर्ला मा तालुका सचिव आबा चिपकर

जलदुर्ग यशवंत गड किल्ला वाचविण्यासाठी शिवप्रेमींकडून करण्यात येणाऱ्या बेमुदत आमरण उपोषणास मनसे चा पाठिंबा- मनसे वेंगुर्ला मा तालुका सचिव आबा चिपकर

हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन नियमोचित व्हावे याकरिता बेमुदत आमरण उपोषण करावे लागते हेच आपले दुर्दैव – आशिष सुभेदार

राज्य सरकार व केंद्र सरकारच्या प्रयत्नाने युनेस्कोच्या यादीत दाखल झालेल्या सिंधुदुर्गातील ता. वेंगुर्ला, रेडी गावातील राज्य संरक्षित स्मारक असलेल्या जलदुर्ग यशवंत गडाचा डोंगर पोखरून सीआरझेड क्षेत्रात आरसीसी चे अनधिकृत बांधकामापासून गडाचे संरक्षण, संवर्धन, जतन व छत्रपती श्री.शिवाजी महाराजांच्या गडास पर्यटनाच्या नावाखाली करण्यात येणारे अनधिकृत, विनापरवाना बांधकामावर कारवाई व्हावी तसेच सदर अनधिकृत बांधकामास छुपी परवानगी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी याकरिता शिवप्रेमींचे दि. २०/०२/२०२३ रोजी पासून बेमुदत आमरण उपोषणास शिवप्रेमी राजन बापू रेडकर , भूषण विलास मांजरेकर हे बसले असून त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असल्याचे वेंगुर्ला माजी तालुका सचिव आबा चिपकर यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे.


हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या गड किल्ले हा महाराष्ट्राचा श्वास असून त्याचे संवर्धन व जतन नियमोचित व्हावे याकरिता शिवप्रेमींना बेमुदत आमरण उपोषण करावे लागते हेच आपले दुर्दैव असे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा