*वक्रतुंड साहित्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखीत पत्रलेखन..*
*स्वातंत्र्यासाठी बलीदान देणारया सर्व अनामिक हौतात्म्यांस….*
.
स्वातंत्र्यासाठी, प्राणांची आहुती देणार्या सर्व,अनामिक, हुतात्म्यांनो
अगदी ह्रदयापासुन
नमस्कार 👏👏
खरंतर, तुम्हाला आठवण्याचे खरं कारण की, देशाला स्वातंत्र्य मिळुन,७५, वर्षे होत आली आहे..अन् आम्ही सगळे ,मी अन् माझे ह्या स्वार्थीपनात एवढे दंग झालो की,आम्ही आपल्याला आणि ,आपल्या बलिदानाला पुर्णपने विसरुन गेलो.. आम्हाला अजुनही स्वातंत्र्याची खरी किंमत कळलींच नाही आम्हाला.. ,मला वाटतं आम्ही सारे भारतीयांनी,फक्त स्वातंत्र्य दिन वगळता,आपली कधी आठवणही काढली नाही…
पन्, .. देशाची आजची गंभीर परिस्थिती पाहून मात्रं खरंच अगदी प्रकर्षाने आपली आठवण होत आहे.. स्वातंत्र्याच्या ह्या काळात आज तिकडे,सर्वंत्र भ्रष्टाचार, बेकारी, महागाईंन जनता पोळूनं गेली, मुठभर धनदांडगे आणखींच श्रीमंत होत आहे अन् सर्वसामान्य गरीब अधिक गरीब होत आहे असं आहे सद्ध्याचं हे लोकशाही राज्य, ….
मराठेशाहीतलं बारभाही राजकारण आहे असं मला वाटतं,, अन् हे सारं पाहुन मला आपली खुप आठवन होत आहे,…
स्वातंत्र्यातलं लोकशाहीचं राज्य!!. खरंच , सद्ध्या लोकशाही आहे का ? सारखा,हा मला प्रश्न पडतो… सद्ध्या तर ज्याच्या हाती सत्ता त्यांची हुकुमत, खरंतर लोकशाही हा शब्द हे तोंडी लावण्यापुरतांच वापरंला जात आहे.. अन्. लोकशाहीनं दिलेल्या “मतदानांचा हक्क” हे शस्त्र थोड्याशा मोबदल्यात विकंत घेतलं जातं आहे असं दिसतंय.. सद्ध्या अशा काही घटना घडताना दिसतं आहे की,पैशांनं मानसं सुद्धा विकंत घेता येतात असं वाटु लागलंय.. कारण लोकशाही,,.. प्रत्येकाला वैयक्तिक मत आहे अन् तो आपल्याला हवं तसं करु शकतो,असं चित्र दिसंत आहे…अन ह्या गोष्टीचांच फायदा घेत आहे चानक्षं अन्,,मुसद्दी मांनसं…
अगदी आम्ही सारे किती स्वार्थी अन् मतलबी, आहोत ?? फक्त, आपल्या जयंती, पुण्यतिथी, ह्या वेळी, फक्त सोपस्कार म्हणून आपल्या सर्वांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्यांना हारफुलं वाहुन मोकळे झालो.. बसं एवढंच काय ते काम केलं.. चारदोन फूलं वाहुन श्रदधासुमने वाहण्यापर्यंतच आम्ही आपलं कर्तव्य बजावत आलो आहोत ह्याबद्दल मला अत्यंत खेद वाटंत आहे...
कष्टाशिवाय , मिळालेल्या पैशाची किंमत नसते.. अगदीं अगदी सहज सोपं अन् आमचं स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे आम्हाला स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या बलिदानाचं मोल असं कळनार? स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची सजा भोगणारयांचे दुःख कसे कळनार? तरुंगकोठडी, अन् तुरुंगातील प्राणांतिक शिक्षकांचे दुःख कसे कळणार?? छातीवर गोळ्या देवुन प्राण समर्पण करणारे देशभक्तांचे त्याग हे फक्त आम्ही पुस्तकांत वाचतो अन् सोडुन देतो…
खरंच, स्वातंत्र्यपूर्व काळातील तुम्ही सारे दैवी मानसं होता,,, तुम्हा सर्वांच्या मनात देशप्रेमाची ज्वाला धगधगत होती ..अन् त्यामूळेंच इंग्रजी जुलमी राजवटीच्या सत्तेला जाळुन टाकण्या साठी पेटुन उठलांत.अन स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.. अन् आम्हाला विनासायास स्वातंत्र्य मिळाले.. ह्याबद्दल आम्ही तुम्हाला काय दिले??
फक्त काही मिनिटे श्रद्धांजली!!!. एवढंच मोल?? …. खरंच, तुमच्या बलिदानाचे मोल आम्ही कधीच फेडू शकणार नाही .. त्याबद्दल आम्ही क्षमेस पात्रं नाही..
आपण भरभरून दिलेल्या जाज्वल्य प्रेरणादायी कार्याची जाणीव ही पिढी पुर्णपने विसरुन गेली आहे.. कदाचित ह्यासाठी पुन्हा ती जाणिव जागृत व्हायला हवी,जर शक्य असेल तर त्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा यावं लागेल..
स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना आम्ही एकंच कळकळीची विनंती करतो की,तुम्हाला शक्य असेल तर,.भावी पिढीसाठी चैतन्यमयी तेज बहाल करावं.. किंबहुना, भावी पिढीच्या मनात ते त्यागाचे दैवी विचारांच पुनर्स्थापना करण्यासाठी आपल्या दैवी स्वातंत्र्यगाथेचे विचार रुजावायचे कार्य करण्यासाठी आम्हा सर्व देशवासीयांना प्रेरणा द्यावी ही नम्र विनंती..
पुन्हा सर्व हुतात्म्यांना मनःपूर्वक दंडवत करतो.🙏
जगन्नाथ खराटे.. ठाणे